Crop inspection correction : सत्यापनकर्ता (व्हेरीफायर) लॉगिन मधून पीक पाहणी दुरुस्तीची कार्यपद्धत -NNL
नांदेड| संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम-2024 पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅपद्वारे पीक नोंदणी करण्यात येणार आहे. पीक पाहणी दुरुस्तीबाबत कार्यपद्धती नमूद केल्या आहेत. गाव नमुना बारामध्ये जाहिर केलेल्या पीक पाहणी संदर्भात दुरुस्तीसाठी प्राप्त अर्ज, हरकत या मंडळ अधिकारी यांनी संबंधित गावाला भेट देऊन योग्य ती चौकशी करून दुरूस्त करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे य सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 नियम 30 अनुसार खंड 4 मधील गाव नमूना 12 बाबत सूचना क्र. 2 नुसार करण्यात आली आहे. डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) मध्ये केंद्राच्या निर्देशाप्रमाणे शंभर टक्के नोंदीचे फोटो घेणे आवश्यक आहे.
यानुसार पुढील सुधारीत तरतुदी तयार करण्यात आली आहे. गाव नमुना बारामध्ये पिके जाहिर केल्यानंतर जर पीक, क्षेत्र, जलसिंचनाचे साधन, पड जमिनीबाबत किंवा शेरा स्तंभातील माहिती (...
