Sunday, May 24

Tag: from today 28th January Sangata

World Gurakhi Literature  : गुराखीगडावर आजपासून ३१ वे जागतिक गुराखी साहित्य संमेलन २८ जानेवारीला सांगता

World Gurakhi Literature : गुराखीगडावर आजपासून ३१ वे जागतिक गुराखी साहित्य संमेलन २८ जानेवारीला सांगता

नांदेड, महाराष्ट्र
लोहा | गुराखी, मेंढपाळ व नाहिरे वाल्या समाजाच्या जिभेवरचे मौखिक साहित्य, त्यांची संस्कृती व परंपरा जगासमोर यावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेले जागतिक गुराखी साहित्य संमेलन यंदा ३१ व्या वर्षात पदार्पण करत असून, लोहा शहरालगत असलेल्या ऐतिहासिक गुराखीगडावर २६ ते २८ जानेवारी या कालावधीत ते उत्साहात संपन्न होणार आहे. या संमेलनाची मुहूर्तमेढ १९९१ साली भाई केशवराव धोंडगे यांनी रोवली. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव ॲड. मुक्तेश्वर धोंडगे आणि प्रा. पुरुषोत्तम धोंडगे यांनी हा साहित्याचा वसा अखंडपणे पुढे चालवला आहे. संमेलनाचे उद्घाटन पोहरादेवी संस्थानचे महंत परमपूज्य बाबूसिंह महाराज यांच्या हस्ते होणार असून, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे हे संमेलनाध्यक्ष म्हणून लाभणार आहेत. या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे, ॲड. ...
error: Content is protected !!