Public support of Baburao Kadam Kohlikar : हिमायतनगरातील असंख्य मुस्लिम बांधवांचा बाबुराव कदम कोहळीकर यांना जाहीर पाठिंबा -NNL
हिमायतनगर| हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदार सांघट येणाऱ्या हिमायतनगर येथील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदान निर्मिती कामात भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई झाली नसल्याने याबाबत याचिका दाखल केली आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार यांच्या कार्य शैलीवर नाराज होऊन हिमायतनगर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गन्नी यांच्यासह पाच नगरसेवक व काँगेसच्या असंख्य शहराध्यक्ष फेरोज कुरेशी सह अनेक मुस्लिम बांधवांनी पोलीस ठाणे नजीक बाजार चौकात कार्यक्रम घेऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर याना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे बाबुराव कदम कोहळीकर यांच्या मताधिक्यात भर पडणार आहे.
काँग्रेस पक्षाची एकगट्ठा मतदान असलेल्या हिमायतनगर शहरातील असंख्य मुस्लिम समाज बांधवानी आज पर्यंत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या मित्र पक्षालाच मतदान करून निवडून दिले आहे. मात्र मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे स...
