Greetings from Guardian Minister Girish Mahajan : पालकमंत्री गिरीश महाजन यांचा शुभेच्छा संदेश -NNL
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनाला नांदेड जिल्हयातील सर्व मान्यवर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, मराठवाडा मुक्ती संग्राममधील स्वातंत्र्य सैनिक, सर्व सहकारी, अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांना मी अभिवादन करतो. आज आम्ही भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. लाखो लोकांच्या बलिदानानंतर हा दिवस साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच साजरा झाला. आपली लोकशाही हळूहळू प्रौढ होत असून आम्ही आणखीन जाणीव, जबाबदारीने काम करावे, असे संकेत यातून दिले जात आहेत.
स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेऊन आमची वाटचाल असली पाहिजे. घटनेच्या परिघात राहून स्वातंत्र्याचा समान उपभोग घेणे लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. थोडक्यात स्वातंत्र्य ही जबाबदारीही आहे. देशातील समस्या, देशातील परिस्थिती यावर टीकाटिपणी करण्याचा आम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र सोबतच आपण ...
