Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग ५ (लेखक – धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर)
आत्मीय स्वागत आणि यात्रेच्या महोत्सवाची झलक!”
वंदे भारतने आम्हा सर्वांना सकाळी ११ वाजताच्या सुमारास श्रीनगर स्टेशनवर उतरवले. गाडी थांबताच सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान फुलले… ‘१०० टक्के उपस्थिती. मनोमन महादेवाचे स्मरण केलं, "हे तुझं आशीर्वादाचं बल आहे, म्हणून हा सोहळा शक्य होतो आहे.
शहरात मोठ्या वाहनांना नो-एंट्री असल्यामुळे १६ बुलेरो व टाटा सुमो आधीच बुक केल्या होत्या. स्थानिक ट्रॅव्हल्स एजंट सज्जाद भाई आमच्या स्वागताला स्वतः हजर होते. त्याच्याशी घट्ट मिठी झाली, केवळ ट्रॅव्हल्स एजंट नव्हे, तर यामधील एक आपुलकीचा दुवा. त्याने एका गाडीत ८ जण बसवण्याची सूचना केली, पण मी निर्णय घेतला, प्रत्येक गाडीत केवळ ६ जण! प्रवासी आणि सामान दोन्ही यथास्थित ठेवून आरामदायक प्रवासाचा निर्णय घेतला. आमच्या सर्वांनी आधीच "काश्मीर टूर"चा बिल्ला लावलेला होता, त्यामुळे श्रीनगरच्या ‘हॉटेल बुर्ज’ गाठताना ...

