Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १३ (लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
योगायोगाने लाभलेले शक्तिपीठ दर्शन आणि भोलेबाबाच्या यात्रेचा सेवाभावी मंत्र
आजच्या दिवशी अमृतसरमध्ये पोहोचणे एवढेच उद्दिष्ट होते, त्यामुळे सर्वांना निवांत उठण्याच्या सूचना रात्रीच दिल्या होत्या. तरीही काही जण लवकर उठून पुन्हा एकदा रघुनाथ मंदिराचे दर्शन घेऊन आले.साडे नऊच्या सुमारास प्रत्येकाने ₹५० भरून कुछवाणी चौकात थांबलेल्या मोठ्या बसेसपर्यंत पोहोचलो. तिथे श्री अमरनाथजी लंगरचे पदाधिकारी आमच्या वाटेकडेच पाहत होते. त्यांनी प्रेमाने आग्रह करून आम्हाला लंगरमध्ये नाश्तासाठी नेले. खरेतर नाश्ता म्हणण्यापेक्षा भरपेट गरमागरम जेवणच मिळाले
चिची माता शक्तिपीठ दर्शन
दोन्ही बसेस अमृतसरकडे निघाल्या. कोणतेही विशेष साईटसीन नसल्यामुळे ज्ञानोबा जोगदंड यांना विचारल्यावर त्यांनी "चिची माता मंदिर" सुचवले. हे मंदिर जम्मूपासून ३३ किमी अंतरावर सांबा जिल्ह्यात वसलेले असून एक प्राचीन शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आह...
