Saturday, June 27

Tag: Four-day yellow alert issued

yellow alert : नांदेड जिल्ह्यासाठी चार दिवसांचा यलो अलर्ट जारी

yellow alert : नांदेड जिल्ह्यासाठी चार दिवसांचा यलो अलर्ट जारी

कृषी, नांदेड
नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २३ सप्टेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 23,24,25 व 27 सप्टेंबर 2025 या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. दि. 23 व 25 सप्टेंबर 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा व दि. 26 व 27 सप्टेंबर 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे. या गोष्टी करा : - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.आ...
error: Content is protected !!