Former MLA Madhavrao Patil Jabalgaonkar : माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच राजकीय विरोधकाना “चकमा”
हदगाव, शेख चांदपाशा| भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी अखेर ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतल्याचे चित्र होते. भाजपात त्यांच्या प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु असताना, गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्यानंतर मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट झाले.
हदगाव हिमायतनगर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात माजी आ.जवळगावकर यांचा भाजप प्रवेश अमित शहा यांच्या उपस्थितीत "शंखनाद" मेळाव्यात होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र त्यांनी अनेक राजकीय जाणकाराचे अंदाज चुकविले प्रत्यक्षात त्यांनी भाजपात प्रवेश न करता आयोजित काँग्रेसच्या तिरंगा रॅलीत सहभागी होत "मी काँग्रेस मध्येच आहे" असा स्पष्ट संदेश दिला. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय समीकरणं रचली गेली होती. अनेकांच अंदाज चुकला.
विशेषतः हदगाव विधान सभाक्षेत्राचे विद्यमान आ.बाबुराव कदम कोहीळकर य...
