Venkatesh Chaudhary : व्यंकटेश चौधरी यांच्या ‘अनाहत’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
नांदेड| नांदेड येथील महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांच्या प्रीतिप्रेमाच्या भावनेला आध्यात्मिक उंचीवर नेणाऱ्या 'अनाहत' काव्यसंग्रहाला मातोश्री केवळाबाई मिरेवाड राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ अशोक कौतिक कोळी, पांडुरंग पुठ्ठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षण समितीने ही निवड केली असून, संयोजक कवी वीरभद्र मिरेवाड यांनी मातोश्री केवळाबाई मिरेवाड यांच्या पुण्यस्मरण दिनी ही घोषणा केली. नांदेडच्या दत्ता डांगे यांच्या इसाप प्रकाशन संस्थेने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून महाराष्ट्रातील ख्यातकीर्त चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अनाहतचे मुखपृष्ठ तयार केले आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
व्यंकटेश चौधरी यांचा हा तिसरा काव्यसंग्रह असून यापूर्वी त्यांचे गंधबन (निर्मल प्रकाशन), एक शून्य प्रतिक्रिया ...
