Meenal Karanwal : समाजाने दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा- मीनल करनवाल -NNL
नांदेड| दिव्यांग व्यक्तींप्रती समाजाने अधिक संवेदनशील असणे आवश्यक असून त्यांच्या सक्षमी करणसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, महात्मा गांधी सेवा संघ संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव महेश सोवजी, बालरोगतज्ज्ञ डॉ. आशिष अग्रवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, निवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार आदींची ...
