Rabi season : रब्बी हंगामासाठी पाणीपाळी सोडण्याचे नियोजन -NNL
नांदेड| नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड या विभागांतर्गत असणाऱ्या निम्न मानार मोठा प्रकल्प, उर्ध्व मानार मध्यम प्रकल्प, करडखेड मध्यम प्रकल्प, कुंद्राळा मध्यम प्रकल्प, पेठवडज मध्यम प्रकल्प, महालिंगी मध्यम प्रकल्प, कुदळा मध्यम प्रकल्प, 1 कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा व 50 लघु प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना कळविण्यात आले आहे की, सदर नमूद प्रकल्पांवर रब्बी हंगाम सन 2024-2025 राबविण्याचे नियोजित आहे.
सर्व धरणांत 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या स्थितीनुसार पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून, उपलब्ध पाणी साठ्याच्या अनुषंगाने प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगाम पूर्ण क्षमतेने राबविण्याचे नियोजित आहे. सदर नियोजनास आवश्यकतेनुरुप कालवा सल्लागार समितीची मंजूरी मिळाल्यानंतर त्याप्रमाणे पाणीपाळी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यानुषंगाने सर्व संबंधित लाभधारकांना आवाहन करण्यात येते की, हंगाम सुरू...
