Thursday, May 14

Tag: for persons with disabilities

Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या

Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | दिव्यांग प्रवाशांना शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत देण्यात यावी, तसेच नांदेड ते हदगांव दरम्यान रात्रीच्या वेळेत जादा एस.टी. बसेस तातडीने सुरू कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी स्थानिक व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. एस.टी. महामंडळाचा प्रवास सामाजिक बांधिलकी, सुरक्षितता व विश्वासाचा मानला जातो. सध्या महाराष्ट्र राज्यात शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये महिला सन्मान योजना (५०% सवलत), अमृत ज्येष्ठ नागरिक योजना (१००% मोफत), ज्येष्ठ नागरिक (५०% सवलत) अशा विविध सवलती लागू आहेत. मात्र, दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये कोणतीही सवलत लागू नाही, ही बाब अन्यायकारक असल्याचे समीर पटेल यांनी नमूद केले.  त्यामुळे इतर बसेसप्रमाणे दिव्यांगांना शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये ७५% सवलत देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. रात्री ब...
error: Content is protected !!