Union Minister Nitin Gadkari : हरिभाऊंनी समर्पित भावनेने राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी -NNL
छत्रपती संभाजीनगर| राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल असा त्यांचा प्रवास आहे. आयुष्यभर श्री. बागडे यांनी राष्ट्र निर्मितीसाठी समर्पित भावनेने कार्य केले. श्री. बागडे यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतृत्व व राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नुकतेच 80 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त श्री.बागडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज श्री.रामचंद्र मंदिर (मठ) बालाजी ट्रस्ट मैदान, येथे झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड...
