yellow alert : नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी; विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता -NNL
नांदेड| नांदेड जिल्ह्यासाठी 4 ते 8 ऑक्टोबर 2024 या चार दिवसासाठी येलो अलर्ट हवामान शास्त्र विभागाने जाहीर केला आहे. या चार दिवसांत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 4 ते 8 ऑक्टोबर 2024 या चार दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
या गोष्टी करा :
१)विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा...
