Gunthewari : ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यास मुदतवाढ
नांदेड| जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करुन घेण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार त्या-त्या उपविभागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करुन घेणे व त्यावर कार्यवाही करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिकार प्रदान केले आहेत. महसूल सप्ताहाच्या लोकाभिमूख कार्यक्रमांतर्गत पात्र नागरिकांनी आपले प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे गुंठेवारी कक्षात विहित मुदतीत दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे अनधिकृत भुखंड/अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यास मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यात महानगरपा...
