Hall tickets will be available online : यंदापासून बारावीच्या मुलांसाठी हॉल तिकीट ऑनलाइन होणार उपलब्ध – शिक्षण मंडळाचा निर्णय -NNL
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन (Exam Hall Ticket Will be Available Online) उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश मंडळाने दिले आहे. त्यामुळे यंदापासून बारावीच्या मुलांना आता हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.
शाळेत हॉल तिकीट डाउनलोड करून त्यावर शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी देण्यात यावी अशी सूचना करण्यात आली आहे . हॉल तिकीट अर्थात प्रवेश पत्र उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांकडून कोणतीही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेश पत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक प्राचार्य यांचा शिक्का उमटून स्वाक्षरी करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
हॉल तिकीट संदर्भातील सर्व सूचना मुख्याध्यापक प्राचार्य यांना करण्यात आल्या असून ...
