Gautam Buddha Murth : भोपाळवाडी येथे तथागत गौतम बुद्ध मुर्तीच्या पंधराव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन -NNL
उस्माननगर। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीच्या पंधराव्या वर्धापन दिन उस्माननगर येथून जवळच असलेल्या शांतीदूत बुद्ध विहार सिध्दार्थ नगर भोपाळवाडी , कलंबर बु. लोहा येथे दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी शुक्रवारी मंगलमय वातावरणात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ : ३५ वा .पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण रावसाहेब पाटील भोपाळे ( मा. सरपंच ) यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे उध्दघाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार तथा लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर , यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती मा.पांचाळ मॅडम ( ग्रामसेविका ) , मा. नरेंद्र गायकवाड ( उपसभापती पं.स.लोहा ) , बाबुराव गोरे ( म. गां. तं. मु. अध्यक्ष कलंबर ) , महेश करंडे ( पो.पा. भोपाळवाडी ) , प्रमुख पाहुणे म्हणून शिवाभाऊ नरंगले ( वंचित बहुजन आ. जिल्हाध्यक्ष नांदेड ) , बालाजी परदेशी...
