Thursday, June 25

Tag: farmers in distress

Cloudburst in Shahapur : शहापूर येथे ढगफुटी; खरीप पिकांचे अतोनात नुकसान, शेतकरी हवालदिल

Cloudburst in Shahapur : शहापूर येथे ढगफुटी; खरीप पिकांचे अतोनात नुकसान, शेतकरी हवालदिल

कृषी, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर परिसरात शनिवारच्या मध्यरात्री झालेल्या ढगफुटीमुळे नदी-नाल्यांना अचानक पुर आला. शिवारात पाणी शिरल्याने खरीप हंगामातील सोयाबीनसह तूर, कपाशीची पिके वाहून गेली. नदीकाठच्या शेतातील मातीसकट पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे शेगा कोमेजून गेले होते. आता या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे सर्व गणितच बिघडले आहे. प्रत्येक शेताची मशागत करण्यासाठी ४-५ हजारांचा खर्च येत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांना सर्वसामान्य अनुदान न देता, प्रत्यक्ष नुकसान पाहून मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. “पश्चिम महाराष्ट्राला अनुदान मिळते, मग मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे दुजाभाव का?” असा सवालही ते विचारत आहेत. शेतकऱ्यांनी आगामी रब्बी हंगामासाठी तातडीने अनुदान, बी-बियाणे आणि कास्तीची थेट मदत द्यावी...
Paniganga river floods : इसापूर धरणाचा विसर्ग; पैनगंगा नदीला महापूर, शेतकरी संकटात

Paniganga river floods : इसापूर धरणाचा विसर्ग; पैनगंगा नदीला महापूर, शेतकरी संकटात

नांदेड, उमरखेड, यवतमाळ, व्हिडीओ, हिंगोली
यवतमाळ/नांदेड, अनिल मादसवार| गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसासह इसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. बोरीच्या जुन्या पुलावरून वेगवान प्रवाह सुरू असून, परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने ऊस, सोयाबीन, कापूस, हळद, उडीद, मूग, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कयाधू नदीचे पाणी पैनगंगेत मिसळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. गांजेगाव बंधाऱ्यावरून पाणी वाहत असून ढाणकी मार्गे विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. हिमायतनगर व उमरखेड तालुक्यातील घारापुर, कामारी, विरसनी, दिघी, चाथरी, बोरी, देवसरी, कोपरा, पळसपुर, डोलारी, सिरपल्ली, कोठा, धानोरा, एकंबा, सावळेश्वर, बोरगडी, वारंगटाकळी आदी परिसरातील शेतीपिकांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला तर गावांलागत पाणी आल्याने गावातील घरातही पाणी शिरण्याची शक्यता वर्तविली जात आहे....
error: Content is protected !!