Friday, June 26

Tag: Farmers celebrate Black Diwali

Farmers : तहसीलदारांसमोर ठेसा भाकरी खाऊन शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी!

Farmers : तहसीलदारांसमोर ठेसा भाकरी खाऊन शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी!

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर, गंगाधर मठवाले| ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. खरीप हंगामातील पिकांसह शेतातील मातीसुद्धा वाहून गेली. शेतकऱ्यांच्या आक्रोशानंतर शासनाने मदत निधी जाहीर केला असला तरी हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही नुकसानभरपाई जमा झालेली नाही. या अन्यायाविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने देगलूर तहसील कार्यालयासमोर "चटणी-भाकर आंदोलन" करण्यात आले. शेतकऱ्यांची “काळी दिवाळी” साजरी करून शासनाच्या निष्क्रिय धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ, नेते अमित देशमुख, आणि खासदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, तर प्रदेश सचिव व देगलूर-बिलोली विधानसभा निरीक्षक डॉ. दिनेश नवगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. आंदोलनाचे प्रास्ताविक करताना ...
error: Content is protected !!