Farmer dies : पिकावर तणनाशक फवारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या मारहानीत शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| पिकावर तणनाशक फवारल्याने जाब विचारल्याच्या कारणावरून केलेल्या मारहानीत अखेर 'त्या' शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उगडकीस आली असून याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात पडसा येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
मारहाणीत मयत झालेले वृद्ध शेतकरी माणिक गंगाराम मडावी वय ८५ वर्षे यांचा मुलगा महादेव माणिक मडावी यांनी काल दि. ४ ऑक्टो. रोजी माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार, त्यांचे वडील मयत शेतकरी माहूर तालुक्यातील मौजे मुरली शिवारातील त्यांच्या मालकीच्या शेतातच राखणी करण्यासाठी तेथेच राहत होते.. तर चुलत भाऊ चिंतामण भिमराव मडावी यांचे शेताला लागुन पडसा येथील शेख सुलेमान व शेख माजीद यांचेही शेत आहे.
दरम्यान दि. 22/09/2025 रोजी सिलेमान हाशम शेख वय 55 वर्ष, मोसीन मजीद शेख वय 25 वर्ष, गुड्डु उर्फ वसीम मज्जीत शेख वय 23 वर्ष व मतीन सुलेमान शेख वय 24...
