victims ; पिडीतांना अर्थसहाय देण्याची तरतूद नियमानुसार समाज कल्याण सहायक आयुक्त यांचा खुलासा
नांदेड | अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत पिडीतांना अर्थसहाय देण्याची तरतूद आहे. सदरची योजना ही पिडीत नागरिकांसाठी कल्याणकारी योजना असल्याने कोणतीही व्यक्ती या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. तसेच प्रसार माध्यमातुन अशा प्रकारच्या पुराव्याची शहानिशा न करता प्रशासनाविरुद्ध खोटी व असत्य माहिती प्रसिद्ध करू नये, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
शासन निर्णय 23 डिसेंबर 2016 नुसार अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत पिडीतांना अर्थसहाय देण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास 1.50 कोटी रुपये तरतुद प्राप्त झाली आहे. एकुण 275 पिडीतांना त्याचा लाभ देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने अद्याप एकाही पिडीताची तक्रार समाज कल्याण कार्यालयास आली न...
