12 Th Exam : पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड l जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात आल्याने पहिला पेपर सुरळीत पार पडला अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
पोलीस यंत्रणेमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणत्याही परीक्षा केंद्रावर बाहेरून जमाव दिसून आला नाही. शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून बारावीच्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर झूम वेबकास्टद्वारे थेट निरीक्षण करण्यात आले.
या निरीक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष (वॉर रूम) कार्यान्वित करण्...
