Every accident is preventable : Abhijit Raut : प्रत्येक अपघात टाळला जाऊ शकतो : अभिजीत राऊत -NNL
नांदेड़,अनिल मादसवार | निष्णात फलंदाज सचिन तेंडुलकर फिरकी गोलंदाजीवरही हेल्मेट घालून का खेळतो ?याचे उत्तर ज्याला कळले त्याला रस्तासुरक्षेचे मर्म कळले.त्यामुळे रस्त्यावर अतिआत्मविश्वास न दाखवणे, नियमांचे काटेकोर पालन करणे, हेल्मेट लावणे, सीट बेल्ट लावणे, मोबाईल न वापरणे,फुटपाथवर पायी चालताना कायम रस्त्याच्या उजव्या बाजूला वाहनांकडे तोंड करून चालणे, महत्त्वाचे ठरते. असे केल्यास प्रत्येक अपघात टाळल्या जाऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.
१ जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यंत परिवहन विभागामार्फत राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२५ राबविण्यात येणार असून, त्याकरिता 'पर्वा ' अर्थात इंग्रजी मधील केअर ही थीम घोषीत करण्यात आली आहे. सदर अभियानाचे उद्घाटन ०३ जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम दि...
