counseling center : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना
Dr. Shankarrao Chavan Government Medical College establishes addiction counseling center नांदेड| नशाबंदीबाबत जनजागृती व प्रशिक्षण आयोजित करणार असून या अभियानाचा एक भाग म्हणून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागात दंतशल्यचिकित्सा विभागामधील तंबाखू प्रतिबंध केंद्रामध्ये व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना 28 जून रोजी करण्यात आली.
या केंद्राचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. वाय.एच.चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, दंत शल्य चिकित्सा शास्त्र विभाग प्रमुख डॉ. भावना भगत, तंबाखू प्रतिबंध केंद्र प्रमुख यांचेसह डॉ. सुशील येमले, तंबाखू प्रतिबंध केंद्र प्रमुख यांच्यासह निवासी डॉक्टर्स, परिचर्या संवर्गातील कर्मचारी, रुग्ण व रुग्ण नातेवाईक हे उपस्थित होते.
कें...
