Madhavrao Patil Devsarkar : स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील देवसरकर तर्फे आयोजित नेत्ररोग शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिरास उदंड प्रतिसाद -NNL
नांदेड| हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील देवसरकर यांच्या वतीने आज तामसा येथे समाज उपयोगी नेत्ररोग शिबिर व मोफत शस्त्रक्रिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वराज्य पक्षाचे अनेक पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वयोवृद्ध माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली नेत्र तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी मोफत शिबिराचा लाभ घेतला.
स्वराज्य पक्ष नेहमीच समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी कार्य करत आला आहे, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाची सेवावृत्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, विशेषतः आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत, स्वराज्य पक्षाने एक ठोस धोरण आखले आहे. पक्षाचा उद्देश केवळ निवडणुकीत विजय मिळवणे नसून, मतदार संघातील सर्वसामान्य नागरिका...
