Zilla Parishad ; नांदेड हिवताप,हत्तीरोग संघर्ष समितीने मा.ना.मेघना साकोरे बोर्डीकर मॅडम राज्य मंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण यांना जिल्हा परिषद हस्तांरण रद्द करणे बाबत निवेदन दिले
नांदेड l "सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री मा.ना.मेघना साकोरे बोर्डीकर मॅडम यांना भेटून, राष्ट्रसेवा आरोग्य संघटना व नांदेड हिवताप व हत्तीरोग संघर्ष समितीने दि 15/04/2025 रोजी हिवताप विभाग हस्तांतरण रद्द करणे बाबत निवेदन दिले राज्य शासनाच्या आरोग्यसेवा अंतर्गत हिवताप, हत्तीरोग व जलजन्य आजार हा विभाग स्वतंत्रपणे कार्यरत असून राष्ट्रीय कार्यक्रमात मोडतो.जिल्हा पातळीवर जिल्हा हिवतापप व हत्तीरोग अधिकारी च्यामार्फत कार्यक्रमांची अंमलबजावणी होत. गेले कित्येक वर्षांपूर्वी राज्यात व जिल्ह्यात हिवताप हा आजार अक्षरशः धुमाकूळ घालत असे.
मात्र उपरोक्त विभागांनी मागील अनेक वर्षांत अत्यंत सुनियोजितपणे अन सुरळीतपणे व हत्तीरोग नियंत्रणाचा कार्यक्रम राबवला जात आहे. त्याचा परिणाम म्हणूनच सध्या या आजारांचे प्रमाण देखील अगदी नगण्य आढळून येते आज देखील या विभागाचे अधिकारी,कर्मचारी डास नियंत्रण ,त...
