Eknath Maharaj beej : धानोरा येथे मंगळवारी एकनाथ महाराज बीज उत्सव
हिमायतनगर l तालुक्यातील धानोरा ज. येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही एकनाथ महाराज बीज उत्सवाचा भक्तीमय सोहळा मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पवित्र बीज उत्सवाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकनाथ महाराज मंदिर संस्थान व धानोरा ग्रामस्थांनी केले आहे.
धानोरा ज. येथे अनेक वर्षांपासून एकनाथ महाराज बीज उत्सवाची परंपरा अखंडपणे सुरू आहे. या उत्सवानिमित्त सकाळी श्री परमेश्वर महाराज इटेवाड यांच्या निवासस्थानावरून एकनाथ महाराजांची पालखी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. रामेश्वर महाराज गुंड पाटील (सीरपूरकर) यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.
या कीर्तन सेवेस संगीत भजनाची साथ गायनाचार्य ह.भ.प. शेषराव महाराज टाकळीकर, चंद्रकांत महाराज गोरे, भगवान महाराज गुफंलवाड, तसेच मृद...
