Ek Diva Khaki Uniform : महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ” एक दिवा खाकी वर्दीसाठी’; निबंध स्पर्धा -NNL
नांदेड| पोलीस हा एक असा सैनिक आहे, जो कायम नागरिकांच्या, समाजाच्या, कायद्याच्या रक्षणासाठी तैनात असतो. सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचे 24 तास संरक्षण करणाऱ्या सैन्यदलातील सैनिकांसारखेच पोलीसही डोळ्यात तेल घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर असतात. गुन्हेगारांना शिक्षा होईल इतपत तपास करणे आणि सर्वसामान्यांना स्वातंत्र्याची अनुभूती घेता येईल असे वातावरण निर्माण करणे यासाठी पोलीस नेहमीच बंदोबस्तावर राहुन त्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती असते.
अशा या पोलिसांबाबत बालवयातील विद्यार्थ्यांच्या मनात एक विशिष्ट प्रतिमा तयार झालेली असते. अगदी बालवाडी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील पोलिसांचे आकर्षण असते. शालेय मुलांच्या विचारांना आकार देण्याकरिता अंजनीआई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा संचलित अंजनी फाऊ...
