eating soybean pods : सोयाबीन शेंगा खाल्ल्याने एकाच परिवारातील आठ सदस्यांना विषबाधा; एका मुलीचा मृत्यू -NNL
नवीन नांदेड| सिडको परिसरात एका कुटूंबातील सदस्याने काजांळा तांडा येथील शेतातून सोयाबीनच्या शेंगा आणल्या. त्या शेंगा खाल्ल्याने परिवारातील आठ सदस्यांना विषबाधा झाली आहे. या घटनेत एका १४ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सिडको परिसरातील जय भवानीनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेल्या नामदेव ही खानजोडे हे आजू- बाजूला भावासह राहतात. तीन दिवसांपूर्वी कांजाळा तांडा येथे मिस्त्री कामासाठी गेले असता कामाचा बाजुला असलेल्या शेतातील सोयाबीन शेंगा घरी घेऊन आल्यानंतर सायंकाळी उकळून घेतल्यानंतर त्या बबन यांनी नाम देव यांच्या घरी पण दिल्या. नंतर त्या खाल्ल्याने थोड्यावेळाने शोभा नामदेव खानजोडे वय ५० वर्ष, स्नेहल शिवाजी तलवारे वय १३ वर्ष, बबन शंकरराव खानजोडे वय ५७, अनिल बबन खानझोडे वय ३५ वर्ष, जानू अनिल खानजोडे वय २७ वर्ष, नामदेव ऊकंडजी खानजोडे व सोनाली नामदेव खानजो...
