e-KYC for financial assistance : खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसहाय्यासाठी ई-केवायसी करावी -NNL
नांदेड,गोविंद मुंडकर| दि. 25 सप्टेंबर : राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप/ पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना 0.20 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1 हजार तर 0.20 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5 हजार रुपये (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी 27 सप्टेंबर पर्यंत 100 टक्के ई-केवायसी प्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या scagridbt.mahaitgov.in या वेबपोर्टलवर माहिती भरली जात आहे. त्या करिता कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय आर्थिक सहाय...
