15 monkeys were stuck on a tree in Dolhari : पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या डोल्हारी गाव परिसरात झाडावर 15 वानर ३० तासापासून अडकली -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| पैनगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या डोल्हारी गाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारच्या रात्रीपासून 15 वानर झाडावर अडकून पडले असून, त्यांना वाचविण्यासाठी वनविभागाला रेस्क्यू ऑपरेशन राबवावे लागणार आहे.
गेल्या इन दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. रविवार च्या रात्रीपासून पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून, यामुळे नदी काठावरील परिसरातील शेत शिवारात पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान रविवारी सायंकाळी काही वानर डोल्हारी परिसरातील शेतीच्या बाभळीच्या झाडावर चढली होती. दरम्यान झाडाखाली पुराचे पाणी आल्याने पाणीच पाणी येऊन बाभळीच्या झाडावर दहा ते पंधरा वानरांची टोळी अडकून पडली आहे. वानर झाडावर अडकून असल्याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला दिली मात्र सोमवारी रात्रीपर्यंत वन विभागाचे एकही अधिकारी वानरांना पुराच्या कचाट्यातून ...
