24-hour hospital shutdown : डॉक्टरांच्या देशव्यापी बंद मध्ये लोहयात २४ तास रुग्णालयात ठप्प -NNL
लोहा| कोलकाता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या क्रूर व अमानुष कृत्य व हत्येच्या निषेधार्थ डॉक्टरानी देशव्यापी बंद पुकारला आहे. त्यात लोहा शहर व तालुक्यातील रुग्णालय उघडणार नाहीत लोहा तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ दीपक भारती सचिव डॉ सुनिल ब्याळे यांनी माहिती दिली. या बंदला जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट मेडिकल असोसिएशन यांनीं पाठींबा दिला आहे.
कोलकता येथील महिला डॉक्टरावर झालेल्या अमानुष अत्याचारा मुळे संपूर्ण समान मन सुन्न झाले आहे तसेच या रुग्णालयावर हल्ला करण्यात आला तसेच तोडफोड करण्यात आली. या घटनेचे देशभरात तीव्र फडसाद उमटले घटनेच्या निषेधार्थ लोहा व तालुक्यातील डॉक्टर देशव्यापी बंद मध्ये सहभागी होणार आहेत शहर व अन्यत्र दवाखाने आज शनिवारी १७ ऑगस्ट शनिवारी सकाळी सहा ते १८ तारखेला रविवारी सकाळी सहा असे २४ तास रुग्णालय बंद राहणार आहेत. असे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ दीपक भारती ,सचिव...
