Dr. Rekhatai Patil Chavan Gorlegaonkar : हदगाव – हिमायतनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ मदत जमा करा -डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात तुफान वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली. त्यातच वरील पातळीवर मोठा पाऊस झाल्याने ते पाणी देखील पैनगंगा नदीपात्रात आला. यामुळे हिमायतनगर हदगाव - तालुक्यातील नदी नाल्याच्या काठावरील पिके पाण्याखाली आल्याने शेतीतील सोयाबीन, कापूस यासारखी पिके उन्मळून गेली आहेत. या नुकसानीचे चित्र पाहून शेतकरी राजा हतबल झाला असून, यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांनी केली.
त्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर, डोल्हारी पैनगंगा नदीकाठच्या परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दिनांक ०६ सप्टेंबर रोजी आल्यानंतर गावातील सर्व नागरिक शेतकऱ्यांची भेट घेऊन संवाद साधताना बोलत होत्या. यावेळी डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांनी स...
