Wednesday, May 13

Tag: Dr. Ram Waghmare

Group Education Officer ; विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेसाठी गटशिक्षणाधिकारी फोले यांचे योगदान महत्त्वपूर्ण – डॉ. राम वाघमारे -NNL

Group Education Officer ; विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेसाठी गटशिक्षणाधिकारी फोले यांचे योगदान महत्त्वपूर्ण – डॉ. राम वाघमारे -NNL

नांदेड, करियर
नांदेड। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह त्यांना सृजनशील बनवण्यासाठी हादगावचे गटशिक्षणाधिकारी किशन फोले यांची मेहनत व प्रयत्न महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी केले. बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने आज नांदेड येथे गटशिक्षणाधिकारी किशन फोले यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अध्यक्ष प्रा. शुद्धोधन गायकवाड, सचिव दत्ताहरी धोत्रे, बाबुराव कसबे, संजय नरवाडे, मिलिंद चावरे, अशोक दामोदर, रवी लोहाळे, मिलिंद व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. वाघमारे पुढे म्हणाले, गुणवत्तेसह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी फोले यांनी हादगाव तालुक्यात विविध उपक्रम राबवले आहेत. राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनांमध्ये हादगाव तालुक्यातील शाळा नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत, असेही ते म्हणाले. रिक्त पदांची समस्या असूनही गुणवत्तेवर भर सत्काराला उत...
शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे – डॉ राम वाघमारे-NNL

शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे – डॉ राम वाघमारे-NNL

करियर, नांदेड
नांदेड। शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन साहित्यिक तथा मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. राम वाघमारे यांनी केले. नांदेड येथील श्री शारदा भवन अध्यापक महाविद्यालयात गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायणराव चव्हाण विधि महाविद्यालय व श्री शारदा भवन अध्यापक महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. विना पाटील या उपस्थित होत्या. पुढे ते म्हणाले, विद्यार्थ्यांना परिपूर्ण व सक्षम बनवण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला तंत्रज्ञानात अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल काढून पुस्तकांकडे वळवण्याचे आव्हानात्मक कार्य शिक्षकांसमोर असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश नळगे यांनी केले. या कार्यक्रमास डॉ....
डॉ. राम वाघमारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवार्ड; राज्‍यपाल रमेश बैस यांच्‍या हस्‍ते मुंबईत सन्‍मान -NNL

डॉ. राम वाघमारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवार्ड; राज्‍यपाल रमेश बैस यांच्‍या हस्‍ते मुंबईत सन्‍मान -NNL

नांदेड
नांदेड| पीपल्‍स एज्‍युकेशन सोसायटीच्‍या यंदाच्‍या भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवार्डने नांदेड येथील साहित्यिक, लेखक डॉ. राम वाघमारे यांना राज्‍याचे महामहिम राज्‍यपाल रमेश बैस यांच्‍या हस्‍ते मुंबई येथील यशवंतराव चव्‍हाण प्रतिष्‍ठान येथे आयोजित कार्यक्रमात सोमवार दिनांक 8 जुलै रोजी सन्‍मान करण्‍यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, सोसायटीचे विश्वस्त अॅड. उज्वल निकम, अॅड. बी.के. बर्वे, सचिव डॉ. वामन आचार्य आदींची यावेळी उपस्थिती होती. डॉ. राम वाघमारे हे श्री शारदाभवन संस्थेच्या महात्मा फुले हायस्कूल बाबानगर नांदेड येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असून शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात त्‍यांचे मोठे योगदान आहे. डॉ. राम वाघमारे यांचे 'डोन्ट वरी सर' (कथासंग्रह) 'खे...
error: Content is protected !!