Dr. Jyoti Tai Waghmare : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेलेल्या सावत्र भावाला त्यांची जागा दाखवा -डाॅ. ज्योतीताई वाघमारे -NNL
हिमायतनगर| राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे गोरगरिबांसाठी योजना आखून राज्यात उत्कृष्ट रित्या काम करीत आहेत. अहोरात्र मेहनत घेणारा मुख्यमंत्री आपणाला लाभला, ही खऱ्या अर्थानं भाग्याची गोष्ट आहे. परंतू राजकीय स्वार्थासाठी काहि लोक मुख्यमंत्र्यांना विरोध म्हणून विकासात्मक कामामध्ये खोडा घालण्याचे पाप करीत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद करा म्हणून उबाठा व काँग्रेस,राष्ट्र वादी शरद पवार गट कोर्टात गेले आहेत. त्यांचा फाजील पणा हाणून पाडण्यासाठी आगामी विधान सभा निवडणुकीत महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांना साथ देवून चांगल्या कामात खोडा घालणाऱ्यां विरोधकांना त्यांची त्यांना जागा दाखवून द्यावी. असे अवाहन शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डाॅ. ज्योतीताई वाघमारे यांनी केले.
हिमायतनगर येथील परमेश्वर मंगल कार्यालयांच्या प्रांगणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सन्मान सोहळा व साडी चोळी वाटपाचा ...
