Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाहीचा पुरस्कार केला – भारतीय संविधान व्याख्यानमालेत फारुख अहमद
नांदेड| भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही तत्वांचा स्विकार केला. त्यांची लोकशाही शासन व्यवस्थेची संकल्पना उदात्त होती. लोकशाही म्हणजे निव्वळ राजसत्ता नव्हे तर ती एक जीवनप्रणाली आहे. सर्व सामान्य माणसाला हक्क आणि अधिकार ही व्यवस्था देते म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाहीचा पुरस्कार केला, असे प्रतिपादन येथील वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुख अहमद यांनी केले.
ते भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे तर प्रमुख अतिथी म्हणून सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, बीपीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांची उपस्थिती होती. येथील भारतीय पिछडा शोषित संघटन, लसाकम आणि सप्तरंगी साहित्य...
