डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घ्या – NNL
नांदेड| सन 2024-25 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसामुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत लाभार्थी निवडीकरीता ऑनलाईन प्रस्ताव नविन विहीर व इतर बाबीसाठी 7/12, होल्डीग, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, व बॅक पासबुक इत्यादी कागदपत्रांसह महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी व कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.
या योजनेचे उद्दिष्ट याप्रमाणे आहेत. बदलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची सिंचनाची आवश्यकता विचारात घेऊन जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेर) अंतर्गत सिंचन सुविधांचा लाभ देवून त्यांचे उत्पन्नात वाढ करुन जीवनमान उंचावणे व शेतकऱ...
