The work of laying soil mixed mud started | हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी अंतर्गत रस्त्यावर माती मिश्रित मुरूम अंथरण्याच्या कामाला सुरुवात; प्रशासकीय यंत्रना मूग गिळून गप्प – NNL
हिमायतनगर,दत्ता शिराणे । शहरापासून पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली जाणाऱ्या अर्धवट रस्त्याबाबत अनेकदा वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ठेकेदाराने अखेर भर पावसाळ्यात रस्त्यावर सोलींग गिट्टी अंथरण्याचे काम सुरू केले आहे. या अंतर्गत रस्त्यावर सोलींगवर माती मिश्रित मुरूम अंथरल्या जात असल्याने पावसाच्या पाण्याने चिखलाचे साम्राज्य पसरणार आहे. ठेकेदाराने जनतेच्या रेट्यामुळे व बातम्यांमुळें अखेर कामाला सुरुवात केली. परंतू या अंतर्गत रस्त्यावर पुन्हा एकदा चिखल झाल्याचे पहावयास मिळत आहे.
हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत कोट्यावधी रूपयांचा विकास निधी मंजूर झाला. जवळपास दोन वर्षांचा कार्यकाळ संपला मात्र या रस्त्याचे काम अतिशय कासव गतीने सुरू आहे. औरंगाबाद स्थित सिद्दीकी या ठेकेदाराने या कामाचे बारा वाजविले आहेत. कामाचा अवधी संपुष्टात ये...
