Collector Abhijit raut : निवडणूक विषयक सोपविलेली कामे गांभीर्याने करा – जिल्हाधिकारी -NNL
नांदेड| विधानसभा निवडणूक 2024 कामकाजासाठी विविध कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात नोडल अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक कामासाठी नियुक्त्या करण्यात आल्या असून नियुक्त अधिकारी -कर्मचारी यांनी निवडणूक विषयक सोपविलेली कामे गांभीर्याने पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 विषयक अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, नियुक्त नोडल अधिकारी, कर्मचारी आदीची उपस्थिती होती.
विधानसभा निवडणूक 2024 कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वीपच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढविण्...
