Vakritunda Ganesh Mandal of Usmannagar ; डीजे मुक्त गणेशोत्सव उस्माननगरच्या वकृतुंड गणेश मंडळाचा अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडून गौरव
उस्माननगर l सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण पुरकतेचा संदेश देत श्री गणेश उत्सव २०२५ मिरवणुकीमध्ये डीजे मुक्त , डाॅल्बी, कर्कश आवाजाचा वापर न करता पर्यावरण पुरक मुक्त मिरवणूक काढल्या बध्दल उस्माननगर ( मोठी लाठी ) ता. कंधार येथील वक्रतुंड गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाच्या गणेशोत्सवात डीजे मुक्त असा ऐतिहासिक निर्णय घेतला. महाराष्ट्र पोलीस दल व नांदेड जिल्हा पोलीसांच्या आणि उस्माननगर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उत्सव शांततेत काढल्याबद्दल नांदेड जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक श्री अविनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उस्माननगर येथील वक्रतुंड गणेश मंडळांचे नांदेड जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे. उस्माननगर ये...
