District Rank second ; संगणकीकरणात जिल्हा दुसरा ; 64 संस्थांचे संगणीकरण -NNL
नांदेड। सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत सहकार चळवळ पोहोचवण्यासाठी व त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी जिल्हा सहकार विकास समितीची (डीसीडीसी ) जिल्हास्तरावर स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्याला संगणीकरणात राज्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर डीसीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उपक्रम सुरू आहेत.
सदर योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील 64 विविध सहकारी संस्थानची संगणकीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आपला नांदेड जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याअनुषंगाने 64 विविध सहकारी संस्था या आता 'गो-लाईव्ह ' या स्टेजपर्यंत गेलेल्या आहेत.
आपल्या जिल्ह्यात 84 प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था अर्थात पीएससीस अर्थात पॅक्स यांनी नागरी सुविधा केंद्र (सिटीजन सर्व्हिसेस, सीएससी ) सूरू केले आहे. गावामध्ये संगणकीय सेवा पुरवितात.
आपल्या जिल्ह्यात 11 पीएससी पॅक्स निवड प्रधानमंत्री...
