Dengue ; डेंग्यू उद्रेक इळेगाव गावास जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांची भेट
भोकर l भोकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मोघाळी अंतर्गत मौजे इळेगाव येथे डेंग्यू दूषित रुग्ण आढळून आल्याने आज दि. 5 ऑगस्ट रोजी डेंग्यू उद्रेक गावास डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड व डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड यांनी भेट दिली व रूग्णांची भेट घेऊन गावात कंटेनर सर्वे, ताप रूग्ण सर्व्हेक्षण, धुर फवारणी,अळीनाशक औषधी फवारणी करून वैद्यकीय पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. परिसर स्वच्छता, आठवड्यातून एक दिवस सर्व पाणी साठे घासून, पुसून कोरडे करावे व कोरडा दिवस पाळवा जेणे करून डेंग्यू डास होणार नाहीत याची माहिती दिली.
यावेळी त्यांच्या सोबत डॉ संतोष सुर्यवंशी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, डॉ अंन्सारी साथरोग अधिकारी नांदेड, डॉ संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी भोकर, वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल होगे, डॉ व्यंकटेश निलावार मोघाळी, डॉ राजपुत , सं...
