Dr Sangita Deshmukh : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख -NNL
नांदेड| सद्यस्थिती नांदेड जिल्हा मध्ये वातावरणा मध्ये बदल झाला असून वातावरणात दमटपणा आहे. ऑगस्ट महीना पावसाळयाचे दिवस असताना पावसाचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांना रात्री थंडी दिवसा गरम वातावरण मध्ये किटकजन्य आजार चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक यांना ताप अंगदुखी, सांधेदुखी गुडघेदुखी या आजाराचे रुग्ण मध्ये लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे किटकजन्य आजार यांचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी नागरीक यांनी खबरदारी घ्यावी.
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा मध्ये प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात व शहरी भागात उपाययोजना करण्यात येत आहे.
१) जानेवारी ०१-०१-२०२४ ते २९-०८-२०२४ दरम्यान संशयित डेंगू ताप रुग्णांचे रक्तजल नमुने एकूण 748 तपासणी करता घेण्यात आले. त्यापैकी ग्रामीण ३८९, शहरी ८९, मनपा २७० असे संशयित डेंग्यु ताप रुग्णांच...
