Mahur ; माझी वसुंधरा प्रचार, प्रसार व जनजागृती नपं माहूर कडून सुरुवात
श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर l भारत व महाराष्ट्र सरकार यांच्याकडून संयुक्त पणे महाराष्ट्र राज्यात स्वच्छ सर्व्हेक्षण २०२५ व माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात येत आहे.नगर पंचायत माहूर ने या अभियानात या वर्षी सुध्दा सहभाग घेतलेला आहे. मागील वर्षी नगर पंचायत माहूर ने मराठवाड्यात दुसरा क्रमांक पटकावला होता.
या अभियाना अंतर्गत मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण व माझी वसुंधरा २०२५ चा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार्या एल ई डी व्हॅन ला नगर पंचायत माहूर च्या प्रांगणातुन दिनांक ७ फेब्रुवारी रोजी हीरवी झेंडी दाखवून प्रचार, प्रसार व जनजागृती ची सुरुवात करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष दोसाणी यांनी जनतेला आवाहन करतांना म्हणाले की,माहूर शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांना विनंती करतो की,माहूर शहराला नावलौकिक मिळण्यासाठी माहूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्...
