Agriculture and Grain Festival ; दोन दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव संपन्न 50 लाख रुपयांपेक्षा अधिक शेत मालाची थेट विक्री
नांदेड l महाराष्ट्र शासन, कृषि विभाग व रोटरी क्लब, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित 2 दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 17 व 18 मार्च 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे संपन्न झाला. या महोत्सवास नागरिक, ग्राहक उर्त्स्फूत प्रतिसाद दिला असून या दोन दिवसात 50 लाख रुपयांपेक्षा अधिक विक्री झाली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली आहे.
जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये शास्त्रज्ञ शेतकरी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात कृषी विज्ञान केंद्र पोखरणी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी शेतातील आधुनिक तंत्रज्ञान हवामान बदल व शेती पुढील आव्हाने या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवनवार यांनी पौष्टिक ...
