Forest Department ; मृत बिबट्याचा शोध मांडवी वनविभागाला लागेना ? खरेच मृत बिबट्याला फुटली काय पाय -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। रविवारी (ता .२७) रात्री सारखणी बीटातील वडोलीच्या जंगलातील हनुमान मंदिरापासून ३०० मीटर अंतरावर बिबट्या सुन्न अवस्थेत पडल्याचे ग्रामस्थांना दिसला ग्रामस्थांनी बिबट्याच्या अतिशय जवळ जावून मोबाईलद्वारे चित्रीकरण करून वनविभागाला कळवले.
परंतु, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर न पोहचल्यामुळे घटनास्थळी बिबट्या नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गाढ झोपेत असलेला वन विभाग खडबडून जागे झाला व बिबट्याचा शोध सुरु केला, तीन दिवसापासून जंगलात ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याचा शोधाशोध सुरू आहे. परंतु, त्यांना बिबट्याचा आणखी कुठलाही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे बिबट्या गेला कुणीकडे? शोधू कुठे? म्हणण्याची वेळ वन विभागावर आली आहे.
वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दीला नाही. त्यामुळे सहाय्यक वनसंरक्षक गणेश गिरी या...
