बाहेरगावाहून आलेल्या एसटीतील महिला प्रवाशांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी शंभर छत्र्या दिल्या -NNL
नांदेड। रविवारी सकाळपासूनच नांदेड शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याची कल्पना नसल्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या एसटीतील महिला प्रवाशांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी शंभर छत्र्या दिल्या असून अनपेक्षितपणे मोफत छत्र्या मिळाल्याचे पाहून भिजणाऱ्या महिलांनी समाधान व्यक्त केले.
पावसात सर्वजण आराम करत असताना दिलीप ठाकूर यांनी समाजसेवेचा वसा सुरू ठेवत संतोष भारती यांच्यासोबत बसस्थानक गाठले. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नांदेड बस स्थानकावर एसटीतून उतरलेल्या महिला प्रवाशांची तारांबळ उडत होती. सोबत असलेल्या लहान मुलांना भिजण्यापासून वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न महिला करत होत्या. स्वतः जवळचे सामान घेऊन पावसात चालणे त्यांना अवघड होत होते. अशा परिस्थितीत दिलीप ठाकूर हे सर्वांना छत्री देत होते.
अनोळखी व्यक्तीकडून छत्री घेण्यास काही भगिनी संकोच करीत होत्या. परंतु दिलीप ठाकूर यांनी त्यांना एका भावाक...
