Sayalani Baba Yatra ; उस्माननगर येथून इस्माईल तांबोळी ( सरकार) यांच्या नेतृत्वाखाली सैलानी बाबा यात्रेसाठी भाविक रवाना
उस्माननगर, माणिक भिसे l सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा महोत्सव यात्रेतील नारळाच्या होळीसाठी उस्माननगर येथील सरकार इस्माईल तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली १२ मार्च बुधवारी रात्री साडेआठ वाजता भाविकांनी भरलेली एसस्टी महामंडळ रवाना झाली.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उस्माननगर येथून इस्माईल तांबोळी ( सरकार) यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा महोत्सव यात्रेसाठी भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन निघत असतात. होळीच्या दिवशी येथे नारळाची होळी करण्याची शेकडो वर्षाची परंपरा आजही कायम आहे. दरवर्षी होळीच्या दिवशी सैलानी बाबा यांच्या यात्रेला सुरुवात होत असते. हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढविल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा केली जाते.
त्यानंतर होळी पेटवली जाते. तर भाविक भक्तांची श्रद्धा म्हणून नाराळ, जूने क...
