Friday, June 26

Tag: Deputy Tehsildar and contract operator caught

Acb Action in Hadgaon : 7500 रुपयांच्या लाचेप्रकरणी नायब तहसीलदार व कंत्राटी ऑपरेटर रंगेहात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Acb Action in Hadgaon : 7500 रुपयांच्या लाचेप्रकरणी नायब तहसीलदार व कंत्राटी ऑपरेटर रंगेहात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील हदगाव येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात लाच मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेशन वितरणाशी संबंधित प्रलंबित कामासाठी ७५०० रुपयांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे व कंत्राटी संगणक ऑपरेटर गोविंद जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी हदगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराचे नावावर रेशन दुकान असून मागील चार महिन्यांतील ५७ हजार रुपये कमिशन, नोव्हेंबर २०२५ मधील ई-पॉस मशीनवरील पुरवठा अपलोड, तसेच २७ नवीन लाभार्थ्यांची नोंदणी ही कामे जाणीवपूर्वक रखडवून ठेवण्यात आली होती. ही कामे करण्यासाठी शासनाकडून मिळालेल्या कमिशनपैकी २० टक्के रक्कम लाच म्हणून मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला. कऱ्हाळे यांच्या उपस्थितीत कंत्राटी ऑपरेटर गोविंद जाधव यांनीही त्याच लाचेची मागणी केली होती...
error: Content is protected !!