Ganjgaon ; गंजगाव ग्रामपंचायतीकडून प्रवासी बस सुरू करण्याची मागणी
बिलोली l गंजगाव ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन सार्वजनिक प्रवासी बस सुरू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत कार्यालय, गंजगाव येथून पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गंजगाव हे गाव तालुका व जिल्हा मुख्यालयापासून दूर अंतरावर तेलंगाना सीमा भागात असूनही येथे नियमित एस.टी. बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, शेतकऱ्यांना बाजारपेठेत जाण्यासाठी, तसेच सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी आणि आरोग्यसेवेसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, गंगाजाव हे गाव कुंडलवाडी मार्गावर वसलेले असून परिसरातील अनेक गावे या मार्गावर अवलंबून आहेत. मात्र, बससेवा नसल्यामुळे नागरिकांना खासगी...
